Nagpur : खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पातून राखमिश्रित पाण्याची गळती, कोलार नदी प्रदूषित होण्याची भीती
Continues below advertisement
Nagpur : नागपूरच्या खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पातून राखेचं पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीतून राखमिश्रित पाण्याची गळती सुरू झाली आहे.. या राखमिश्रित पाण्यानं जवळच वाहणारी कोलार नदी प्रदूषित होण्याची भीती व्यक्त होतेय..खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून एका पाईपलाईनच्या माध्यमातून औष्णिक वीज केंद्रातील राख मिश्रित पाणी वीज केंद्राच्या वारेगाव येथील राखेच्या बंधाऱ्यात पोहोचवलं जातं. काही दिवसांपूर्वी राखेचा बंधारा फुटून आजूबाजूच्या पंचक्रोशीत राखमिश्रीत पाणी पसरलं होतं.. आणि पर्यावर्णाची मोठी हानी झाली होती.
Continues below advertisement