Solapur : सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेत रोख रक्कम काढण्यावर निर्बंध, खातेधारकांचा संताप अनावर
Continues below advertisement
सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेने रोख रक्कम काढण्यावर निर्बंध घातले आहेत. खातेदारांना यापुढे सात दिवसांत फक्त पाच हजार रुपये रक्कम काढता येणार असल्यानं खातेधारकांचा संताप अनावर होताना पाहायला मिळतो आहे. थकीत कर्जाची वसुली नियमित न झाल्याचे कारण देत बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. बँकेत पैशाचा तुटवडा असल्यानं केवळ 5 हजार रुपये आठवड्याला काढता येतील अशी सूचना खातेधारकांना दिली आहे. मात्र काही दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल असे बँकेचे म्हणणे आहे. खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि कर्जाच्या मोबदल्यात ठेवण्यात येणारे तारण देखील कर्जवाटप क्षमतेच्या दुप्पट एवढे आहे त्यामुळे खातेदारांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बँकेतर्फे करण्यात येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Bank Solapur Bank Laxmi Sahakari Bank Laxmi Sahakari Bank Solapur Laxmi Cooperative Bank. Withdrawal