Laxman Hake On Darsa Melava| मी येतोय तुम्ही पण या...हाकेंचे कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी आवाहन

Continues below advertisement

Laxman Hake On Darsa Melava| मी येतोय तुम्ही पण या...हाकेंचे कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी आवाहन

ब्रेकिंग-ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, भगवान भक्ती गडावर,  पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या दसरा  मेळाव्याला उपस्थित राहणार , मी येतोय तुम्ही पण या... लक्ष्मण हाके यांचे भगवान भक्ती गडावर येणाऱ्या भाविकांना आवाहन...

हे ही वाचा

मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणाऱ्या भाविकांची विशेष काळजी घेण्यात येतेय. आतापर्यंत नारायणगडावर जवळपास 500 क्विंटल बुंदीचे गाळप महाप्रसाद स्वरूपात करण्यात आले आहे. दिवस-रात्र भाविकांसाठी मराठा सेवकांचे हात झटत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा बीड जवळील नारायणगडावर आयोजित करण्यात आलाय. नारायण गडाच्या 900 एकर परिसरात दसरा मेळावा होणार असून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या भाविकांची विशेष काळजी घेतली जात आहे. जेवणा बरोबर महाप्रसाद म्हणून बुंदी तयार केली जातेय. आता पर्यंत तब्बल 500 क्विंटल बुंदीचे गाळप करण्यासाठी शेकडो मराठा सेवकांचे हात झटत आहेत. तर गडाच्या परिसरात असणाऱ्या गावांमध्ये विशेष भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था टँकर आणि बाटल्यांमधून करण्यात आली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram