OBC Quota Row: 'विखे महामूर्ख, डोक्यावर परिणाम झालाय', Laxman Hake यांचा Vikhe Patil यांच्यावर हल्लाबोल

Continues below advertisement
OBC आरक्षण (OBC Reservation) आणि मराठा आरक्षण (Maratha Reservation) यांवरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर, तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सरकारची बाजू मांडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लक्ष्मण हाके यांनी 'विखे हा गोगलगाय आणि पोटात पाय,' असं म्हणत, 'विखे नावाचा माणूस हा महामूर्ख माणूस आहे,' अशी जळजळीत टीका केली आहे. विखे पाटील यांनी मराठा समाजाची बाजू घेतल्याचा आरोप करत, यापुढे ओबीसी समाज त्यांना मतपेटीतून उत्तर देईल, असा इशारा हाके यांनी दिला आहे. दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'देवेंद्र फडणवीस सरकार ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही,' असे आश्वासन दिले आहे. सरकार मराठा आरक्षणावरील जीआरबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola