Laxman Hake on Manoj Jarange : तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक, बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर

Lakshman Hake On Manoj Jarange: प्रत्येक आंदोलनात जरांगे वेगळी मागणी करत असून जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जीआर काढतो याची लाज वाटते असं म्हणत जरांगे तमाशातला सोंगाड्या आहे. जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या, यापेक्षा जरांगेंची लायकी नाही, असा टोला ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके (Lakshman Hake) यांनी लगावलाय. जालन्यातून ते बोलत होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उफाळून आला असून मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरु असतानाच ओबीसीही आक्रमक भूमिका घेताना दिसतायत. दरम्यान, मराठा आरक्षणाची भूमिका समजून घेण्यासाठी अंतरवली सराटीला गेलेल्या नेत्यांनाही लक्ष्मण हाकेंनी चांगलंच सुनावलंय. हैदराबाद गॅझेट ,सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का? असा सवालही त्यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola