Latur | लातूरमध्ये पोकलेनचा विचित्र स्फोट; हवेत उडालेले स्पेयर पार्ट्स लागून दोन जण ठार

लातूर : जिल्ह्यातील देवकरा गावाच्या शिवारात रात्री विचित्र घटना घडली आहे. या गावातील प्रभाकर मुरकुटे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरु होते. यासाठी पोकलेनची मदत घेण्यात येत होती. पोकलेनच्या मदतीने काम जलद गतीने करावे असा त्यांचा विचार होता. यासाठी देवकरा गावाच्याच बाजूच्या कोळवाडी गावातील दहिफळे यांनी मध्यस्ती करत पोकलेन भाड्याने मिळवून दिला होता. रात्री साडे आठ वाजता शेतात विहीर खोदण्याचं काम सुरु असतानाच अपघात झाला. पोकलेनचा भीषण स्फोट झाला. त्याचे सर्व लोखंडी सामान आणि त्याचे स्पेयर पार्ट हवेत उडाले.
 
पोकलेनचे उडालेले भाग बाजूलाच उभे असलेले प्रभाकर मुरकूटे आणि दहिफळे यांच्या अंगावर पडले. या अपघातात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोकलेनला भीषण आग लागली होती. मोठा आवाज ऐकून लोक घटनास्थळी धावले. घटनेची माहिती किणगाव पोलीस ठाण्यास मिळताच तत्काळ अहमदपूर येथून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola