Uddhav Thackeray Farmers : देवेंद्र फडणवीसांच्या सरकारात शेतकरी उपाशी मरतोय, उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांचा संताप

Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला, जिथे शेतकऱ्यांनी सोयाबीनला मिळणारा कमी भाव, पीक नुकसान भरपाई आणि कर्जमाफी यावर आपली नाराजी व्यक्त केली. 'सरकार शेतकऱ्यांची बेइज्जत करून सोयाबीन खरेदी करतंय', असा थेट आरोप एका शेतकऱ्याने केला. उत्पादन खर्च प्रति क्विंटल ५,००० रुपये येत असताना बाजारात फक्त ३,००० ते ४,००० रुपये भाव मिळत असल्याची खंत शेतकऱ्यांनी मांडली. शासकीय खरेदी केंद्रांवर प्रचंड गर्दी आणि ऑनलाइन नोंदणीतील अडचणींमुळे कुटुंबातील महिलांना आणि वृद्धांनाही रांगेत उभे राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनीसाठी 'बहुमूलधारक' असल्याचे कारण देत भरपाई नाकारल्याचा आणि रब्बीच्या मदतीतून लातूर जिल्ह्याला वगळल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाल्याचे मत व्यक्त करत, शेतकऱ्यांनी ठाकरे यांच्याकडे विधानसभेत आवाज उठवण्याची मागणी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola