Fake Suicide Notes: Latur मध्ये आरक्षणासाठीच्या 'आत्महत्या' बनावट, पोलिसांचा धक्कादायक खुलासा!
Continues below advertisement
लातूर जिल्ह्यात आरक्षणाच्या नावाखाली झालेल्या आत्महत्या बनावट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तीन तालुक्यांमधील घटनांमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. अहमदपूर तालुक्यातील बळीराम मुळे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नात मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहिली होती. निलंगा तालुक्यातील शिवाजी मेळे यांच्या मृत्यू प्रकरणात महादेव कोळी समाजासाठी आत्महत्येची चिठ्ठी सापडली. तसेच, बंजारा समाजासाठी आत्महत्येची चिठ्ठीही बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. "आम्ही अनेक मराठा दाखवून ओबीसीच्या तरुणांचा खून केला गेला, हा गंभीर आरोप मी करतोय," असे एका वक्त्याने म्हटले आहे. सध्याचे वातावरण संशयाचे असून, कुणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. या आत्महत्यांमागे सामाजिक आणि राजकीय दबावतंत्र तसेच आर्थिक लाभाचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांच्या सखोल चौकशीतून सत्य समोर आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement