Latur Bandh | छावा संघटनेच्या Vijaykumar Ghadge यांना मारहाण, आज Latur बंद!
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी घाडगे यांना मारहाण केली होती. सुरज चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत आणि त्यांना शासन होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आज लातूर बंद आणि परवा लातूर जिल्ह्याचा बंद करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सगळ्या पक्षांनी सहभाग घेतला आहे. घाडगे हे राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांना कृषिमंत्र्यांच्या विरोधात निवेदन द्यायला गेले होते. दोन दिवसांपूर्वी कृषिमंत्री सभागृहात पत्ते खेळताना आढळून आले होते. त्यामुळे 'असे कृषिमंत्री नको' असा उद्देश सांगण्यासाठी पत्ते भेट दिले आणि निवेदन देऊन बाहेर आले. रेस्ट हाऊसच्या ठिकाणी बसल्यानंतर राष्ट्रवादीचे काही गुंड लोक आले आणि त्यांनी हल्ला केला. "सत्तेचा माज काय असतो तो आज आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बददलवावयाला मिळाला," असे आंदोलकांनी म्हटले आहे. या भ्याड आंदोलनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आंदोलक एकत्र आले आहेत. सुरज चव्हाणला त्याची जागा दाखवण्याचा कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे. सकल मराठा समाज पूर्णपणे या आंदोलनाच्या मागे लागणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या सभागृहात मांडले जातात, त्या ठिकाणी कृषिमंत्री रम्मी खेळत बसतात आणि त्याचा जाब विचारण्यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित झाल्यावर त्यांना मारहाण केली जाते, हा चळवळ संपवण्याचा विषय आहे. लातूर जिल्ह्याच्या इतिहासात असा भ्याड हल्ला कधीही कुणाच्याही काळात झाला नाही.