Lockdown | मुलं गावात,आम्हाला चैन नाही; लातूरच्या क्वॉरन्टाईन सेंटरमधील परप्रांतिय मजुरांचा आक्रोश
महाराष्ट्रात 40 हजाराहून अधिक मजूर, इतर राज्यातले लोक अडकले आहेत. त्यातले काही जण पायी चालत आपापल्या गावाकडे निघाले होते. जोगोजागीच्या पोलिस बंदोबस्तात ही मंडळी पोलिसांच्या ताब्यात आली. त्यांना क्वॉरन्टाईन केले गेले आहे. अनेक जण 20-25 दिवसापासून विविध ठिकाणी अडकले आहेत. त्यांची माहिती स्थानिक प्रशासनाने संकलित केली आहे. पण त्या माहितीये पुढे कांहीही झालेले नाही. ह्या सेंटरमध्ये अडकलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या कहाण्या विदारक आहेत.