Lata Mangeshkar Birth Anniversary : लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त संगीत महाविद्यालयाचं उद्घाटन
Continues below advertisement
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज 'आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे' (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International Music College) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन झाले. त्यावेळी लता दीदींच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)म्हणाले,"दीदी आपल्या सोबत नसल्या तरी आपल्या सोबत कायम आहेत".
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"दीदी आपल्या सोबत नसल्या तरी आपल्या सोबत कायम आहेत. एक दैवी शक्ती त्यांच्यात होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लता दीदींचा आवाज कानावर पडत नाही असा एकही दिवस जात नाही".
Continues below advertisement