Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, ब्रीच कँडी रुग्णालयानं दिली माहिती
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयानं दिली आहे. रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये लतादीदींच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालयानं दिलेय. लतादीदींना कोविड न्युमोनिया झाल्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालायाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.