Lata Didi Samrak : लतादीदींच स्मारक शिवाजी पार्कवर व्हावं ही मंगेशकर कुटुंबाची इच्छा नाही : ABP Majha

लता मंगेशकर यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांना शोकसागरात लोटलं मात्र दीदींच्या स्मारकावरून सुरू झालेलं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाहीये. अखेर या स्मारकाच्या वादावर मंगेशकर कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया आलेय.
शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचं स्मारक व्हावं अशी मंगेशकर कुटुंबीयांची इच्छा नाही असं हृदयनाथ मंगेशकरांनी एबीपी माझाला सांगितलंय..राजकारणी व्यक्तींनी स्मारकाचा वाद थांबवावा असं आवाहनही त्यांनी केलंय... महाराष्ट्र सरकारनं लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय..हीच लतादीदींना खरी श्रद्धांजली ठरेल असं हृदयनाथ मंगेशकर म्हणाले आहेत..आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठाची स्थापना लतादीदींच्या नावे करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola