Fertilizer prices hiked : रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच खतांच्या किंमतीत मोठी वाढ ABP Majha
Continues below advertisement
ऐन हिवाळ्यात पावसानं झोडपल्यानं रब्बी हंगामाला फटका बसला आणि शेतकऱ्यासमोरच्या अडचणी वाढल्या. हे कमी म्हणून की काय, रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच आता खतांच्या किमतीतही मोठी वाढ झालेय. रब्बीची पेरणी सुरू असताना झालेल्या या महागाईमुळे शेतकरी त्रस्त आहे. युरिया आणि डीएपी खताचे दर वाढलेले नसले तरी रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या इतर खतांच्या किमती मात्र वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या खिशाला मोठा खड्डा पडणार आहे.
Continues below advertisement