Language Row: कल्याणच्या DMart मध्ये मराठी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, MNS ने महिलेला विचारला जाब
Continues below advertisement
कल्याणमधील वसंत व्हॅली (Vasant Valley) परिसरातील डीमार्टमध्ये (DMart) एका परप्रांतीय महिलेने मराठी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या महिलेला जाब विचारला. ‘मला पोलिसांची आवश्यकता आहे का?’, असा प्रश्न विचारत तिने सुरुवातीला प्रतिसाद दिला. मनसेच्या हस्तक्षेपानंतर या महिलेने अखेर माफी मागितली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement