Maharashtra Language Policy Row | Bombay Scottish आणि भारतीय भाषांवरून वाद, राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली होती. मुलांना Bombay Scottish School मध्ये शिकवून भारतीय भाषांना विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या टीकेला राज ठाकरेंनी आज सडेतोड उत्तर दिले. इंग्रजीला पायघड्या घालायच्या, Bombay Scottish मध्ये शिकायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, हे सहन करणार नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले. दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षणमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियममध्ये शिकून मुख्यमंत्री झाले, असे राज ठाकरेंनी नमूद केले. "कुठे काय शिकल्याचा काय संबंध?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, कोणाकोणाची मुले परदेशात शिकत आहेत, याची यादी आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर काय करणार, असा सवालही त्यांनी केला. शिक्षण माध्यमावरून सुरू असलेल्या या वादाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.