Central Railway : कसारा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या

Continues below advertisement

मुंबईसह उपनगरात आणि कर्जत-कसारा झालेला पाऊस आणि काही ठिकाणी रुळावर माती आल्यानं मुंबईकडे येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या नाशिक आणि इगतपुरीमध्येच थांबवण्यात आल्यात. कसारा घाटात रेल्वे रुळावर माती आल्यानं लांबपल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक ठप्प झालीय. तर पावसाचं पाणी थेट कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील उंबरमाळी रेल्वे स्थानकात फलाटावर आल्यानं अप आणि डाऊन मार्गावरील उपनगरी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची कसारा ते टिटवाळा आणि कर्जत ते अंबरनाथ स्थानकांदरम्यानची लोकल वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आलीय. पण अंबरनाथ ते सीएसएमटी आणि टिटवाळा ते सीएसएमटीदरम्यानची लोकल वाहतूक सुरळीत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram