राज्यातील Bhu vikas बँकेतील 33 हजार थकबाकीदारांचे कर्ज माफ करण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश
राज्यातील भू-विकास बँकेतील ३३ हजार थकबाकीदारांचे ३४८ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे निर्देश देण्यात आलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत हे निर्देश दिलेत. या निर्णयामुळे कोल्हापुरात फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. भू-विकास बँका बंद करुन बँकेच्या मालमत्ता विकून तसेच कर्ज वसुली करुन कर्मचारी, अधिकारी यांची देणी देण्याबाबतचा निर्णय २०१५ मध्ये घेण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात याबाबतील कोणतीही कार्यवाही पुढे झाली नव्हती