Lalit Patil Case : ललितच्या सांगण्यावरुनच शिंदेगावात एमडी कारखाना, ललित, भूषणच्या चौकशीत माहिती समोर
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 09:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLalit Patil Case : ललितच्या सांगण्यावरुनच शिंदेगावात एमडी कारखाना, ललित, भूषणच्या चौकशीत माहिती समोर
ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्याच सांगण्यावरुन त्याचा भाऊ भूषणने शिंदेगावात एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरु केला, अशी माहिती चौकशीतून समोर आलीय. ललित पाटील आणि भूषण पाटील हे सध्या नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून काही धक्कादायक माहिती नाशिक पोलिसांच्या हाती लागत आहेत. एमडीच्या फॉर्म्युल्यासाठी ललितच्या सांगण्यावरुन अरविंद लोहारे आणि हरिश पंत यांनी भूषणला मदत केल्याचं दोन्ही भावांच्या समोरासमोरील चौकशीतून स्पष्ट झालं आहे. शिवाय यातून १२ कोटींची कमाई केल्याचंही ललितने पोलिसांना सांगितलं.