Lalit Patil : 15 दिवस ललितचा कुठे - कुठे मुक्काम? संपूर्ण माहिती सर्वप्रथम 'एबीपी माझा'वर

Lalit Patil : 15 दिवस ललितचा कुठे - कुठे मुक्काम? एबीपी माझावर ललित पाटीलचा मोठा दावा 
ड्रग्ज माफिया ललित पाटीलने पोलीसांना गुंगारा देत अनेक  (Sasoon Hospital Drug Racket) ठिकाणी फिरत होता. मात्र बंगळूरूहून चेन्नईला जात असताना त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ससून रुग्णालयाच्या गेटवर ड्रग्ज सापडलं. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली होती. त्यातील एक म्हणजे ललित पाटील. हा ललित पाटील ससूनमधील वॉर्ड नं. 16 मध्ये उपचार घेत असल्याने पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं नव्हतं. ताब्यात घेण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरु असतानाच ललितने ससूनमधून पळ काढला आणि त्यानंतर एखाद्या क्राईम वेबसीरीजला शोभेल असं ड्रग्ज रॅकेट पुढे आलं. 


JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola