Parliament Security Breach: संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा : ABP Majha
Continues below advertisement
लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या कटाचा मास्टरमाईंड ललित झा हाच असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचा शोध सुरू आहे. ललित झा यानेच १३ डिसेंबरची तारीख निश्चित केली होती, असं चौकशीत समोर येतंय. गुरूग्राममध्ये ललित झा याने एक महत्त्वाची बैठक घेत हा कट आखला होता, असं पोलीस तपासात समोर येतंय. लोकसभेत मनोरंजन आणि सागर शर्माने घुसखोरी केली तेव्हा प्रेक्षक गॅलरीतून या प्रकाराचं शुटींग ललितनेच केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केलं. तसेच, ललित झासोबत चौघेही आरोपी संपर्कात होते. घटना होण्याआधी त्याने चौघांचे फोन ताब्यात घेतले आणि तो फरार झाला, असं पोलिसांनी म्हटलंय. ललित झाचं शेवटचं लोकेशन नीमरानाजवळ आढळलंय. ललित झाचा संबंध असलेल्या एका एनजीओचीही चौकशी केली जातेय. या एनजीओला येणारा निधी कुठून येतो याचा तपास सुरू आहे.
Continues below advertisement