Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाच्या विसर्जनात अडचणी, कारण नेमकं काय? ABP MAJHA
पहाटे आलेल्या मोठ्या भरतीमुळे लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले आहे. भरतीमुळे मूर्ती तलाव्यावर ठेवण्यात अडचण येत आहे. ओहोटीनंतर मूर्ती तलाव्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी भरती आल्यामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन काहीसे उशिराने होत आहे. दुसरीकडे, नाशिकमध्ये सव्वा दोन लाख मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले आहे. यामुळे महानगरपालिकेला गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यात मोठे यश मिळाले आहे. कृत्रिम तलावातील विसर्जनामुळे मूर्तींची विटंबनाही टळली आहे. पंचवटी परिसरात सर्वाधिक ९० हजार २६९ मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झाले. त्याचबरोबर नाशिक रोड परिसरातही ५० हजार ८७६ मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले.