Lalbaugcha Raja Visarjan | चंद्रग्रहणात विसर्जन गोंधळ, CM कडे तक्रार, गुन्हे दाखल करण्याची मागणी
Continues below advertisement
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविरोधात मुख्यमंत्री फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे. यंदाच्या विसर्जन प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन चंद्रग्रहणाच्या काळात झाले. यामुळे लाखो गणेश भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप समितीने केला आहे. तसेच, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. समितीने ईमेलद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवले असून, मंडळातील कार्यकारिणी सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, "लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा जो काही प्रसंग काल आपण पाहिलेला आहे आणि त्या विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये जो काही घोळ झालेला आहे, त्या घोळाच्या विरुद्ध आज आम्ही मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ईमेलद्वारे लिखित तक्रार केली आहे आणि या तक्रारीत हा काय जो घोळ झालेला आहे त्याची शहानिशा करून आम्ही चौकशी करण्याची मागणी केली आहे." या घटनेमुळे गणेशोत्सव मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement