Lalbaugcha Raja Visarjan : बाप्पा चालले आपल्या गावाला, लालबागच्या राजा गिरगाव चौपाटीवर

लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांचा अलोट जनसागर उसळला आहे. मागील वीस वर्षांपासून लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पार पडत आहे. यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन नव्या, अत्याधुनिक आणि स्वयंचलित तराफ्यातून होणार आहे. हा तराफा मागील तराफ्याच्या तुलनेत दुप्पट मोठा आहे. गुजरातमध्ये या तराफ्याची निर्मिती करण्यात आली आहे. मोठ्या जहाजांमधील तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी गोष्टींचा वापर करून हा तराफा बनवण्यात आला आहे. हा तराफा पाण्यामध्ये ३६० अंशांमध्ये कुठेही वळण घेऊ शकतो. रात्री ९ वाजता लालबागच्या राजाची आरती होईल आणि त्यानंतर रात्री १० वाजता अंतिम विसर्जन सुरू होईल. गोळीबांधवांकडून सलामी दिली जाईल. हायड्रॉलिक लिफ्ट आणि डायव्हर्सच्या मदतीने विसर्जन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अनंत अंबानी हे लालबागच्या राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे मानद सदस्य म्हणून विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. काल दुपारी ११ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola