Lalbaugcha Raja Darshan | तासन्तास रांगेत, CCTV निगराणीत बाप्पाचे दर्शन

Continues below advertisement
मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. गणेशोत्सवासाठी अवघे काही तास उरले असताना, लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दर्शनासाठी विशेष नियोजन केले आहे. जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी बाप्पाच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी एक, दोन नव्हे तर पंचवीस झिगझॅग रांगांची व्यवस्था आहे. या रांगा पार करूनच भाविकांना बाप्पाचे थेट दर्शन घेता येणार आहे. या संपूर्ण रांगा पूर्ण करण्यासाठी साधारणतः तास ते दीड तास लागू शकतो. गर्दी वाढल्यास हा वेळ आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी संपूर्ण रांगेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची विशेष निगराणी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या सर्व झिगझॅग रांगांमधूनच जावे लागेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola