Lalbaugcha Raja Crowd | गणेश उत्सवाच्या आठव्या दिवशी Lalbaugcha Raja च्या दर्शनासाठी अलोट गर्दी
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. लालबाग परळ रस्ता गणेश भक्तांनी व्यापलेला आहे. सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली आहे. गणेश उत्सवाचा आज आठवा दिवस आहे. बाप्पाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी लालबाग परळ भागात दिसत आहे. राज्यातूनच नाहीतर देशभरातून गणेश भक्त लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला आलेले आहेत. भक्त आपल्या परिवारासोबत, पाल्यांसोबत, पत्नीसोबत, आई वडिलांसोबत दर्शनासाठी उपस्थित आहेत. यावर्षी लालबागच्या राजाचे वैशिष्ट्य म्हणजे गजमुख द्वार. गजमुख द्वार पाहण्यासाठी आणि लालबागचे दर्शन घेण्यासाठी यावर्षी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. "गजमुख द्वार जो आहे तो पाहण्यासाठी आणि लालबागचे दर्शन घेण्यासाठी यावर्षी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे." असे प्रतिनिधीने सांगितले.