Lalbaugacha Raja Visarjan : लालबागच्या राजाचं मंडपातून प्रस्थान, लाखो भक्तांची मांदीयाळी

Continues below advertisement

Lalbaugacha Raja Visarjan : लालबागच्या राजाचं मंडपातून प्रस्थान, लाखो भक्तांची मांदीयाळी

अनंत चतुर्दशीला शहरातील कायदा आणि सूव्यवस्था राखण्यासाठी २० हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय वाहतूक विभागाचे अडीच हजार अधिकारी आणि कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. लालबाग गणेश मंडळाच्या सुरक्षेसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गणपती विसर्जन व ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी सुमारे २० हजार पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. १७ सप्टेंबर व १८ सप्टेंबर या दोन दिवशी शहरात ९ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० उपायुक्त, ५६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४ हजार पोलीस निरीक्षकांसह २०,५१० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणारआहेत. याशिवाय मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही संवेदशिल ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय छेडछाड रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणीध्या वेशातील पोलिस असणार आहेत. त्याच बरोबर शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या १० कंपनी, १५ अतिरिक्त प्लाटून, एक हजार गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. गणपती विसर्जनासाठी लालबागचा राजाच्या मार्गिकेवर पाच हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram