lakshya cup | पनवेलमध्ये 29 डिसेंबरला 'लक्ष्य कप' | ABP Majha
पुरुष आणि महिला नेमबाजांची एकत्रित स्पर्धा हे अकराव्या लक्ष्य कपचं मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमा शिरुरच्या वतीनं रविवार २९ डिसेंबर रोजी पनवेलच्या कर्नाळा स्पोर्टस अकॅडमीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातील अनेक उदयोन्मुख रायफल नेमबाज या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतल्या सीनियर विजेत्या एक लाख रुपयांचं, तर ज्युनियर विजेत्याला ५० हजार रुपयांचं रोख इनाम देण्यात येईल.
Tags :
Lakshya Cup