Ladki Bahin Yojana : पहिला हप्ता मिळाला, लाडक्या बहिणी भावाला राखी बांधायला मुंबईत जाणार

Continues below advertisement

Ladki Bahin Yojana : पहिला हप्ता मिळाला, लाडक्या बहिणी भावाला राखी बांधायला मुंबईत जाणार   सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये मिळत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल 80 लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांरीत केला आहे. पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही.    15 ऑगस्ट रोजी साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत.    बँकेत पैसे जमा न होण्याचे महत्त्वाचे कारण हे बँक सिडिंग स्टेटस आहे. बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर  लिंक करणे गरजेचे आहे. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते.   तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. पण तुमच्या अर्जासमोर पेंडिग, Review, Disapproved, असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आहे. त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही 17 तारखेपर्यंत वाट पाहायला हवी. 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram