Kusti : कोरोनाचा कुस्त्यांच्या स्पर्धांना फटका, अनेक पैलवानांवर उपासमारीची वेळ
Continues below advertisement
दोन वर्षापूर्वी कोरोनाचा देशात प्रसार वाढला आणि सर्वच क्षेत्रावर निर्बंधाची मालिका सुरू झाली. महाराष्ट्राचे संस्कृती असलेले कुस्ती क्षेत्रही यातून सुटलं नाही. दोन अडीच वर्ष मध्ये कुस्तीचे एकही मैदान भरले नाही . याशिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही महाराष्ट्राची ओळख आहे त्या स्पर्धा देखील होऊ शकल्या नाहीत. आता कोरोनाची भीती संपलेय, सर्व निर्बंधातून राज्य मुक्त झालेय. आता तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा तातडीने भरवा अशी महाराष्ट्र भरातील पैलवान-कुस्ती प्रेमींची मागणी होतेय. कुस्तीगीर परिषदेने याबाबतीत पाऊले उचलावीत. अन्यथा कुस्तीगीर परिषदेलाच अवकळा आलीय असा प्रश्न उपस्थित होऊ शकतोय.
Continues below advertisement