Kshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा

Continues below advertisement

Kshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा 

हेही वाचा : 

एखाद्या चांगल्या प्रसंगाची सुरुवात राम-रामने होते तर एखाद्याच्या अंतिम प्रवासातही राम नामाचा घोष केला जातो. त्यामुळे तुम्ही राम नामाचा वापर कुठे करता त्यावर सगळे अवलंबून असते. जगातील चित्रपटसृष्टी ही फक्त पाच कथानकांवर चित्रपट तयार करते. यात सूड किंवा बदला घेण्याची कथा क्रमांक एक वर आहे. रामायण आणि महाभारतातल्या प्रसंगांवरून अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. त्यापैकी काही यशस्वी ठरले तर काही सुपर फ्लॉप, मात्र या कथानकांवरून चित्रपट तयार करण्याची प्रथा काही थांबलेली नाही. आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे रोहित शेट्टीचा नवा चित्रपट सिंघम अगेन. देशभरात रामनामाचा जप सुरु असल्याने दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही चित्रपटात रामनामाचा जप करत कोट्यवधींची कमाई करण्याचा घाट घातला आणि त्यासाठी सिंघन अगेनची निर्मिती केली.

रोहित शेट्टीने दक्षिणेच्या सिंघमवर आधारित हिंदीत अजय देवगणला घेऊन सिंघमची निर्मिती केली. हा सिंघम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर रोहितने लगेचच सिंघमचा दुसरा भाग आणला. सिंघम यशस्वी होतोय हे पाहून त्याने अक्षय कुमारला घेऊन सूर्यवंशीची निर्मिती केली. मूळ गाभा तोच फक्त त्याने चित्रपटाचे नाव बदलले आणि नायक बदलला. प्रेक्षकांनी सूर्यवंशीकडे पाठ फिरवली. मग रोहितने रणवीर सिंहला घेऊन सिंघमच्याच धर्तीवर सिंबाची निर्मिती केली आणि हॉलिवूडच्या धर्तीवर यूनिव्हर्सल कॉप चित्रपटांची श्रृंखला आणतोय असे दाखवले. यूनिव्हर्सल कॉप प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्याने मग सिंघम अगेनचा घाट घातला. त्याच्या सर्व सिंघम, सूर्यवंशी, सिंबा यांना एकत्र आणले आणि सिंघम अगेन तयार केला. यात टायगर श्रॉफलाही त्याने यूनिव्हर्सल कॉप श्रेणीत आणण्याचा प्रयत्न केला. दीपिकालाही शक्ती शेट्टी म्हणून लेडी सिंघमच्या अवतारात आणले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram