coronavirus | 31 मार्चपर्यंत चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चाकणची कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात आलीये. त्यामुळं दोन आठवड्यात तब्बल 30 कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे. 1950 साली स्थापन झालेली ही बाजार समिती पहिल्यांदाच बंद करण्याची वेळ प्रशासनावर आलीये.