Krupal Tumane : रामटेकच्या पराभवाचे विलन बावनकुळे;कृपाल तुमानेंचा मोठा गौप्यस्फोट Ramtek Result
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे माजी खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे. रामटेक ही जागा शिवसेनेकडे राहिली नाही मला याचं दु:ख आहे. मी दोन वेळा रामटेचं प्रतिनिधित्व केलं, मोठ्या फरकाने निवडून आलो. मुकुल वासनिकसारख्या काँग्रेसच्या तगड्या नेत्याला मी दोनवेळा मोठ्या फरकाने हरवलं. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी कोणता सर्वे केला मला माहिती नाही. मात्र त्यांनी हट्ट धरला की ही जागा मला मिळायला नको. त्यांनी शिंदे साहेबांवर दबाव टाकला की ही जागा इतर कुणाला द्या. ज्यांचा विधानसभेमधे परफॉर्मन्स चांगला नाही त्यांच्यावर कारवाई करू असं ते म्हणाले होते. आता त्यांच्या कामठीमधून या उमेदवाराला सगळ्यात कमी मतं मिळाली. त्यामुळे आता बावनकुळे काय करावाई करतात हे पाहावं लागेल. कामठीतून महायुतीच्या उमेदवाराला कमी मतं मिळाली ही प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी आहे. पराभवाचे विलन बावनकुळेच आहेत. त्यांनी राजिनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी कृपाल तुमाने यांनी केली. विशेष म्हणजे याबाबतची तक्रार भाजपचे दिल्लीतील नेते अमित शाह यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.