Pandharpur Vitthal Rukmini Temple | श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
कृष्ण जन्माष्टमी निमित्त विठ्ठल मंदिराला रात्री आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. लॉकडाऊनमुळे विठ्ठल मंदिर 17 मार्च पासून बंद असले तरी सर्व परंपरा अखंडित पणे साजऱ्या केल्या जातात.विठ्ठल मंदिरात मोगरा , झेंडू , जिलबी , अष्टर अशा स्थानिक फुलांनी मंदिर समितीकडून ही सजावट करण्यात आली आहे.मंदिर या फुलांच्या सुगंधाने घमघमून गेले आहे . विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चोखंबी व सोलाखांबीत ही आकर्षक फुल सजावट करण्यात आली आहे.