Konkan Vidhan Sabha | कोकणच्या बालेकिल्ल्याचं आव्हान, मशाल विरूद्ध धनुष्यबाण रिंगणात Special Report
Konkan Vidhan Sabha | कोकणच्या बालेकिल्ल्याचं आव्हान, मशाल विरूद्ध धनुष्यबाण रिंगणात
हे देखील वाचा
Maharashtra Vidhan Sabha Election: विधानसभेच्या निकालानंतर काय होईल सांगता येत नाही, शरद पवार-एकनाथ शिंदेचं काहीतरी चाललंय; नवाब मलिकांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काय होईल, हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सध्या वेगळंच काहीतरी सुरु आहे. वेगवेगळी चर्चा या महाराष्ट्रात सुरु आहे. महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल, हे आता ठामपणे सांगता येणार नाही. शरद पवार (Sharad Pawar) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यातही काहीतरी सुरु आहे, अशी जोरदार चर्चाही आहे. विधानसभेच्या निकालानंतर कोण कोणासोबत राहील, हेदेखील सांगता येत नाही, असे वक्तव्य अजितदादा गटाचे नेते नवाब मलिक यांनी केले. ते 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
यावेळी नवाब मलिक यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता निकालानंतर कोणता पक्ष कोणासोबत जाईल, हे सांगता येत नाही. विधासभा निवडणुकीनंतर अजित पवार हे किंगमेकर असतील, हे मी आताच सांगतो. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सगळे लोक माझ्याकडे उभे असतील. तुम्ही तोपर्यंत वाट पाहा, असे नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र, नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असल्याचे वक्तव्य करुन राजकारणात नवा ट्विस्ट आणला आहे. नवाब मलिक यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.