Konkan Rain : कोकणात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, हवामान विभागाचा इशारा
कोकणात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, अशा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्याचवेळी उर्वरित राज्यात पाऊस ओसरण्यास सुरुवात होणार आहे, असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. ही स्थिती गुरुवारपर्यंत अशीच राहील. याशिवाय ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालॅण्ड, मणिपूर, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.