Konkan Railway : कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, विशेष मेमू ट्रेन
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.. आता प्रत्येक रविवारी चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी अशी विनाआरक्षण मेमू विशेष ट्रेन सुरु होणार आहे.. ट्रेन क्रमांक ०११५८ चिपळूण - पनवेल अनारक्षित स्पेशल मेमू ट्रेन ३१ मार्चपर्यंत दर रविवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटेल... तर ०११५७ पनवेल-रत्नागिरी मेमू ट्रेन १ मार्चपर्यंत रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रत्नागिरीला पोहोचणार आहे.