Konkan Railway Special Train : उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वेवर विशेष गाड्या
दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्याने आता उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात जाण्याचे नियोजन करणाऱया कोकणवासीयांना खूशखबर आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील चाकरमान्यांना सहजपणे कोकणात पोहचता यावे म्हणून मध्य रेल्वेने 76 उन्हाळी विशेष गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल-करमाळी या गाडीच्या 18 विशेष फेऱया चालवण्यात येणार आहेत. 3 एप्रिलपासून या गाडय़ा धावणार असून करमाळी-पनवेल ही गाडी 4 एप्रिलपासून धावणार आहे.