Konkan Railway : राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनचं चाक रुळावरुन घसरलं, इंजिन मार्गावर आणण्याचं काम सुरु

कोकण रेल्वेच्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर मार्गावर पडल्याने राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे एक चाक मार्गावरुन उतरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक थांबली आहे. ही घटना आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली. हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी ट्रेन धावत होती. या घटनेनंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी तात्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरु आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola