परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी बातमी, कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश

कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय, गाडी सुटण्याच्या काही वेळ पूर्वी प्रवाशांनी स्थानकात हजर राहावं असं देखील कोकण रेल्वे तर्फे सांगण्यात आलं आहे. दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवेशाला सुरूवात करतात. पण, यावेळी कन्फर्म तिकिट नसेल तर मात्र कुणालाही रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार नाही. जवळपास 225 फेऱ्या कोकण रेल्वे मार्गावर धावत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola