Konkan Railway : कोकण रेल्वेची वाहतूक रखडली, Janshatabdi Express च्या इंजिन मध्ये बिघाड
Continues below advertisement
कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्सप्रेस च्या इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे गाडी गेल्या एक तासापासून कामथे रेल्वे स्टेशनवर थांबली आहे. मात्र यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनचे वेळापत्रक कोलमडलंय. गोव्याकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बिघाड झाल्यामुळे 1 तासांहून अधिक रेल्वे कामथे स्टेशनवर उभी आहे. सध्या इंजिन दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र या खोळंब्यानं अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशीरानं धावतायत. तेजस एक्सप्रेस सध्या चिपळूण स्टेशनवर थांबवण्यात आलेय
Continues below advertisement