Konkan Railway Block : कोकण रेल्वे मार्गावर 23 फेब्रुवारीला मेगाब्लॉक, गाड्या विलंबाने धावणार
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 08:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKonkan Railway Block : कोकण रेल्वे मार्गावर 23 फेब्रुवारीला मेगाब्लॉक, गाड्या विलंबाने धावणार
कोकण रेल्वेवरील सावर्डा-रत्नागिरी विभागात देखभाल-दुरुस्तीच्या कामानिमित्त २३ फेब्रुवारी रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ७ ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत अडीच तासांचा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्या विलंबाने धावतील. एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस आज मडगावदरम्यान पावणे दोन तासांसाठी थांबवण्यात येईल तर तिरुनेलवेली-गांधीधाम एक्स्प्रेस मडगाव इथे सव्वातास थांबवली जाईल. त्यामुळे या दोन गाड्यांसह इतर रेल्वेगाड्या उशिरा धावतील.