Konkan Politics: 'राजकारण दिसल्यास निवडणुकीतून बाद करीन', Narayan Rane यांचा कार्यकर्त्यांना थेट इशारा
Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळकोकणात राजकीय वातावरण तापले आहे. देवरुखमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात शिवसेना आमदार किरण सामंत (Kiran Samant) यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'मला जर राजकारण त्यात दिसलं ना, तर तेवढे लोक निवडणूक स्पर्धेतून बाद करीन,' असा सज्जड इशारा नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. काही स्थानिक भाजप नेत्यांकडून स्वबळाची भाषा होत असताना, राणे यांनी भाजप आणि मित्र पक्षांत वैर नसल्याचे स्पष्ट केले. आपापसात राजकारण करणाऱ्यांना निवडणुकीतून बाद करण्याचा इशारा देत त्यांनी पक्षांतर्गत गटबाजीवर नाराजी व्यक्त केली. युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी गैरसमज पसरवू नयेत, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement