कोकणाला पुढचे दोन दिवस 'रेड अलर्ट' ; चिपळूणात मुसळधार, वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ

महाराष्ट्रातील पुढील पाच दिवस सर्वत्र चांगला पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यात आज आणि उद्या कोकणाला रेड अलर्ट तर मुंबईला आजपासून पुढील ४ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. तर  रत्नागिरीतल्या चिपळूण शहरात जोरदार पाऊस बरसलाय. त्यामुळे वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झालीय. बाजार पुलावर आता पाणी चढू लागलंय. वाशिष्टी नदीवरील जून्या पुलाला पाणी लागलं, त्यामुळे प्रशासन आता हायअलर्टवर आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola