Sugarcane Protest: ऊस दरावरून कोल्हापुरात संघर्ष पेटला, शेतकरी आक्रमक
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 'ऊस उत्पादक शेतकरी हा ऊसाच्या चिपाड्यावर जगतोय आणि दुसऱ्या बाजूला कारखानदार मात्र साखरेनं भरलेल्या पोत्यासारखे गलेलठ्ठ झाले आहेत', अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत ऊसाला प्रति टन ७५१ रुपये पहिली उचल मिळत नाही, तोपर्यंत ऊसाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. सरकारने १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, दर निश्चित होत नसल्याने कारखाने सुरू होण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी ऊस वाहतूक रोखण्यात आली असून, काही वाहनांची जाळपोळ झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत, ज्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement