Kolhapur Rajesh Kshirsagar : शिवसैनिकांच्या नाराजीनाट्यानंतर राजेश क्षीरसागर काय म्हणालेत?
तिकडे कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला जागा सोडल्यानं शिवसैनिकांनी काल जाहीर नाराजी व्यक्त केली. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढवावी म्हणून शिवसैनिकांनी घोषणाबाजीही केली. महाविकास आघाडीच्या मेळाव्याला राजेश क्षीरसागर उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा झडली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला. गेल्या निवडणुकीत पाच जागा पाडणाऱ्या काँग्रेसला उमेदवारी दिल्याचं दुःख आहे अशी प्रतिक्रिया क्षीरसागर यांनी दिली. पण पक्षादेश मानू असंही ते म्हणालेत....