Corona Update : कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक
Continues below advertisement
राज्यातील 21 जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्ह दर हा पाच टक्क्यांहून कमी असताना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. कोल्हापुरचा कोरोना पॉझिटिव्ह दर हा 11 टक्के, सांगलीचा 10 टक्के तर साताऱ्याचा 9.75 टक्के इतका आहे. कोल्हापुरचा विचार केला तर गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची रोजची आकडेवारी ही 1500 ते 2200 पर्यंत वाढत आहे. कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
Continues below advertisement