Raju Shetti | राष्ट्रवादीकडून मिळालेल्या आमदारकीच्या ऑफरबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार:राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र आमदारकीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेऊ असं राजू शेट्टी म्हणाले.
Tags :
Vidhan Parishad MLC Raju Shetty Jayant Patil Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatna Vidhan Parishad Election Ncp