Kolhapur Rain : कोल्हापुरात मुसळधार पाऊस ; पंचगंगा नदीची पाणीपातळी 12 तासांत तब्बल 10 फुटांनी वाढली
Continues below advertisement
सलग कोसळणार्या पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 12 तासात पंचगंगा नदीची पाणीपातळी 10 फुटांनी वाढली. सध्या पंचगंगा नदी 24 फुटांवरुन वाहत आहे. ग्रामीण भागातील अनेक छोटे छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील माजगावच्या छोट्या पुलाचा रस्ता वाहून गेला. शाहूवाडी तालुक्यातील गोगवेनजीक रस्त्यावर झाड आडवे पडून रस्ता ब्लॉक झाला आहे. भडगाव पूल पाण्याखाली गेला आहे तर गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
Continues below advertisement