Kolhapur Corona Update | कोल्हापूरकरांना आता घरातही मास्क वापरावा लागणार?
Continues below advertisement
कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आता घरातही मास्क वापरावा लागण्याची शक्यता आहे. महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या संदर्भातल्या सूचना बैठकीमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर तर मास्क वापरावा लागणारच मात्र आता कोल्हापूरकरांना घरामध्ये देखील मास्क वापरावा लागू शकतो.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाच हजारांच्या वर पोहोचली आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहरातला आकडा हा सर्वाधिक आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील समूह संसर्ग कमी करण्यासाठी पालिकेचे आयुक्त कलशेट्टी यांनी हा एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत कोल्हापूर शहरांमध्ये दाट वस्तीच्या या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडायची असल्यास काही वेगळे पर्याय अवलंब केल्याशिवाय पर्याय नाही.
Continues below advertisement